Name of Book : उत्तररंग

Name of Author : मंगला अवलगावकर

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 97

Synopsis :
दहा बाय दहाची एक खोली आणि दुसरी आठ बाय आठची खोली. त्यात राहणाऱ्या गरीब बाईची ही सत्यकथा. आमच्याकडे पोळ्याला येणाऱ्या मावशींची ही कथा. तसं बाई म्हणजे उत्साहाने सदा ओसंडून वाहणारी, हसतमुख, प्रेमळ आणि सदैव कष्टाला तयार असं रसायन. दोन वर्षे झाली त्या आमच्याकडे पोळ्या करतात. रहाणी स्वच्छ, टापटीप आणि अंगात चुणचुणीतपणा, चटपटीतपणा. काम अगदी जबाबदारीने करायचं हा विशेष! बाईला दोन मुली. त्यांना वाढवायचं - घडवायचं ही झिंग म्हणून मग हा मार्ग निवडला. याच्या जोडीला दिवाळीत फराळाचं करुन द्यायचं, चकल्या, शेव, शंकरपाळे इ. आणि उन्हाळ्यात कुरडया, खारोड्या, पापड आणि बटाट्याचे पापड इत्यादी करणं खूप चांगलं, स्वच्छ नीटनेटक! तर अशा या बाईची ही कहाणी.