Name of Book : माझी माय

Name of Author : ऍड. श्रीधर कसबेकर

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 215

Synopsis :
ऋण मातेचे आणि समष्टीचेही.... ऍडव्होकेट श्रीधर कसबेकर यांचे हे पहिले पुस्तक आत्यंतिक हलाखीच्या परिस्थितीत शिक्षणाचा मनस्वी ध्यास घेऊन जिद्दीने स्वतःचे जीवन स्वतः घडविणाऱ्या एका सह्रुदय, ध्येयवादी माणसाची ही रोमांचक चित्तरकथा...! लेखकाची "माय" म्हणजे कागद, काच, पत्रा गोळा करुन धैर्याने आयुष्य पेलणारी एक कणखर स्त्री! तिच्याकडून उत्तम संस्कारांचे बाळकडू घेऊन मातेच्याच नव्हे, तर समाजाच्या ही ऋणातून उत्तराई होण्यासाठी त्यांनी दिलेली विलक्षण झुंज काळजाचा ठाव घेते. आज एक यशस्वी वकील, राज्यशासन नियुक्त नोकरी आणि तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचा लौकीक आहे. शाश्वत जीवनमूल्यांची जपणूक करीत "कागदापासून कागदाकडे" झालेला त्यांचा हा असामान्य प्रवास असंख्यांना प्रेरणा देणारा आहे. अतिशय प्रासादिक आणि ओघवत्या शैलीतील हे प्रांजल आत्मकथन मराठीतील आत्मचरित्रांच्या अवकाशाच स्वयंतेजाने तळपत राहिल यात संदेह नाहि!