Name of Book : इंद्रधनूचा पूल

Name of Author : संध्या रानडे

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 262

Synopsis :
मग काय करु सरोज? चिडून, भांडून फक्त दुरावाच उत्पन्न होईल आपल्यात. शारिरीक दुराव्याची झळ सोसतोच आहोत आपण. मनानंही दुर जाण्यात काय अर्थ आहे. माझ्याबरोबरची तुझी अमेरिकेची पहिली वारी होती, ती फक्त तिथे शिकायला जाण्यात तुला स्वारस्य होतं म्हणून. पण त्या भूमीवर पाऊल टाकलस आणि तिच्या प्रेमातच पडलीस तू. एका इंद्रधनूच्या पुलावरुन तू सात समुद्र ओलांडलेस. चधूनतर गेलीस तू तो पुल. पण परतता येत नाहिय तुला त्या पुलावरुन त्या इंद्रधनूसारख्याच रंगाच्या बेड्यांमध्ये तुझे पाय कायमचे जखडले गेले आहेत. त्या रंगीत दुनियेत रवीशनं इथे स्थायिक व्हायला हवं असा आग्रह मी कधीच धरणार नाही. कारण त्याचं ह्या विश्वाशी काहीच नातं नाहीय आणि तुझी संगत, सोबत, मदत सगळं काही मला हवंहवंस वाटत असलं तरी त्या बाबतीत मी तुझ्यावर कधीच सक्ती करणार नाहीय. निर्णय तु घ्यायचा आहेस. जे जग आपले नाहीय त्याला कवटाळून बसायचं की प्रयत्नपूर्वक तो इंद्रधनूचा पूल ओलांडून माझ्याजवळ यायचं, ते तू ठरव!