Name of Book : सॅप

Name of Author : प्रा. माधुरी शानभाग

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 151

Synopsis :
या संग्रहात विज्ञानाच्या पार्श्वभूमीवरील बदलत्या आणि न बदलत्या नातेसंबंधाच्या कहाण्या आहेत. विज्ञानकथा या प्रथम "कथा" असाव्यात आणि त्यामधे विज्ञानाने मानवी जीवनात घडवलेले वा घडू शकणारे बदल टिपावेत, असे मला वाटते. त्यात विज्ञान पदार्थातील मीठासारखे असावे, कमी झाले तर अळणी आणि जास्त झाले तर खाता येणार नाही. पण त्याशिवाय पदार्थाची चव वृध्दिंगत होणार नाही. एकोणिसावे शतक रसायनशास्त्राचे होते, विसावे भौतिकीचे तर एकविसावे शतक या दोहोंच्या पायावर विकसित होत जाण्याच्या जैविक शास्त्राचे आहे असे तज्ञांचे भाकीत आहे. विज्ञानसाहित्य हे उद्याच्या शक्यता विचारात घेऊन जीवनव्यवहाराकडे पहात असते आणि त्याच्या केंद्रस्थानी मानवच असतो.