Name of Book : स्वामी-सखा

Name of Author : वैजयंती काळे

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 217

Synopsis :
कॅम्पमधील पुस्तकांच्या दुकानात शुभांगीला बघून अनिरुद्ध चकीत झाला. जिमखान्यावरील मित्राच्या बंगल्या नजीकच्या एका बंगल्यात कधी बागेत तर कधी गॅलरीत, कधी फाटकात मैत्रिणीशी बोलत उभी असलेली ही सुंदर मुलगी अनेकदा त्याने पाहिली होती. पहिल्या दर्शनातच तो तीच्या सौंदर्यावर, लाघवी हास्यावर आणि सहज होणाऱ्या हालचालींमधून निथळणाऱ्या डौलदारपणावर लुब्ध झाला होता. ’ही मला पाहिजे !’ असा हट्ट त्याच्या मनाने तेव्हापासून धरला होता. पण तो ज्या मित्राकडे येत असे, तो चार महिन्यांपूर्वीच तिथे रहायला आलेला. त्यातून त्याचे नुकतेच लग्न झालेले. त्यामुळे तो आता तिकडे बघणे शक्य नव्हते. अनिरुद्धनेच एक दोनदा त्याला विचारुन पाहिले, तेव्हा पुरंदरे म्हणाला," कोण जाणे! बहुतेक तो दीक्षितांचा बंगला असावा. पण ती पोरगी दीक्षित आहे की आणखी कोण, हे ठाऊक नाही."