Name of Book : फुलं आणि समिधा

Name of Author : डॉ. रमा मराठे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 52

Synopsis :
कविता अल्पाक्षरी असते. प्रतिमा प्रतिकांतून अगदी कमी शब्दात खूप काही सांगून जाते. मला उमगलेलं "जगणं" आसासून व्यक्त होऊ लागलं..... फुल आणि समिधातून! "रंग सुखाचे" मध्ये सुखाचा शोध घेण्याचा किंवा "हसत जगावं" मध्ये तणावमुक्तीचे मनःशांतीचे मार्ग धुंडाळण्याचा, "मनगंगेच्या काठावरती" मध्ये मनःशांतीचा मागोवा घेण्याचा माझा प्रयत्न आणि मग गवसलेले "मनाचिये अंधाराचा विनाशु" करणारे काही दिवे... हे सगळं अल्पाक्षरी होऊन अधिक उत्कटतेनं, भावुकतेनं, कलात्मकतेनं आणि लोभसवाणं होऊन प्रकटलं, कवितेतून.... आणि माझी कविता वहात राहीली.... तिचे काठ आहेत-भारतीय संस्कृतीचे... तत्वज्ञानाचे! आत्मभानाचे... आत्मभानाचे!