Name of Book : सावरिया

Name of Author : राधिका टिपरे

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 224

Synopsis :
कितीतरी वेळ नील अनिमिष नजरेनं तिच्याकडं पाहत राहिला..... गोरीपान, शिडशिडीत बांध्याची, लाल तांबूस केसांचा मोठा शेपटा घालणारी, मरुन रंगाच्या सुंदर सलवार कमीजमध्ये आणखीनच सुंदर दिसणारी रमैया त्याला भारी आवडून गेली... मरून रंगाच्या तलम ओढणीमध्ये चेहरा झाकून मूकपणे अश्रू ढाळणारी आणि दुसऱ्या हातानं आपल्या लेकीला घट्ट धरून ठेवणारी ती भारतीय स्त्री त्याची पत्नी होणार होती. गेली वर्षे त्याचा पाठपुरावा करीत राहणारी त्याच्या स्वप्नातील ती स्त्री आज त्याच्यासमोर उभी होती.... हलक्या पावलांनी नील रमैयाकडं गेला... जे घडत होतं ते सर्वच इतकं विलक्षण होतं की नील स्वतःच अंतर्यामी हलला होता. त्याचेही डोळे भरून आले होते... त्याला जे काही बोलायचं होतं ते कोणत्या शब्दात व्यक्त करावं हेच त्याला उमगत नव्हतं...