Name of Book : इंद्रधनुष्य

Name of Author : प्रा. माधुरी शानभाग

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 130

Synopsis :
एकविसावे शतक हे निःसंशय विज्ञानाचे आहे. मानवी जीवनावर झपाट्याने आक्रमण करणऱ्या विज्ञानाने साहित्यातही आपली पावले उमटवली आहेत. संगणक. क्लोनिंग, संपर्कमाध्यमे, ई-वर्ल्ड,.... ही साधने मानवी भावजीवनात वेगाने उलथापालथ घडवतील असा अंदाज समाजशास्त्रज्ञ वर्तवत आहेत. तरीही विज्ञानाच्या आक्रमणाने मानसाचे माणूसपण हरवणार नाही. प्रेम, दया, समता, बंधुत्व ही चिरंतन मूल्ये विज्ञानाच्या अध्ययनाने आणखी झळाळून उठतील, कारण कितीही झपाट्याने भोवताल बदलले तरी माणसाची बुद्धी, ह्रदय आणि मन अक्षय आहे. त्यातून येणाऱ्या प्रकाशातूनच भावनांचे सप्तरंगी इंद्रधनुष्य उमलते आणि त्याचे माणूसपण टिकवून ठेवते.