Name of Book : जुगार

Name of Author : बाबा भांड

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 169

Synopsis :
रणरणत्या वैशाखात खान्देशातल्या पाचोरा शहराबाहेरील पेट्रोलपंपावर तो अख्तरभाईची वाट पाहत होता. सकाळी दहा वाजताच उन्हाच्या झळ्यांनी प्रताप दाखवायला सुरुवात केल्याने रस्ता आणि पंपाच्या बेचक्यातील सरमाड्या लिंबाच्या पातळ सावलीचा त्याने आधार घेतला. समोर पाचोरा-जळगाव रस्त्यावरची विरळ वाहतूक न्याहाळताना क्षणभर अख्तरभाई आणि आबाचा त्याला विसर पडला.