Name of Book : सहप्रवासी

Name of Author : आशा भिडे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 98

Synopsis :
आठ तेराची फास्ट धडधडत रेल्वे स्थानकावर येऊन थांबली. समुद्राच्या लाटा अंगावर घेण्यासाठी आतुरतेने उभ्या असलेल्या मुलांनी समुद्राची पुरुषभर उंचीची लाट खळाळत पुढे पुढे झेपावत येत असताना पाहून घाबरून मागे मागे पळावे नि लाटेने पुढे पुढे यावे तसेच अगोदर गाडी कधी येतेय एकदाची म्हणून प्लॅटफॉर्मवरुन गाडीच्या दिशेने डोकावून, ओथंबून पाहणारे चाकरमाने धाडधाड गाडी स्टेशनात प्रवेश करताच दचकून मागे सरकले. नि गाडी मात्र कोणाचीही पर्वा न करता धाडधाड स्टेशनात शिरुन प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या टोकापर्यंत गेली. धक्काबुक्की करत अनेक चाकरमाने गाडीत शिरले नी लोकलने पुन्हा वेग घेतला.