Name of Book : स्त्रीमुक्तीच्या उद् गात्या

Name of Author : मृणालिनी जोगळेकर

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 146

Synopsis :
उच्च विद्याविभूषित असणाऱ्या मृणालिनी जोगळेकर ह्या एक यशस्वी लेखिका, दुरदर्शन संचालिका म्हणून मराठी वाचकांना, प्रेक्षकांना परिचित आहेत. उत्तम विद्यार्थिप्रिय अध्यपिका, उत्तम ललितलेखिका आणि मोजक्याच पण दर्जेदार कथा लिहिणाऱ्या कथाकार ही त्यांची बहुविध रुपं आहेत. अनेक मराठी मासिकांमधून, वृत्तपत्रांमधून त्यांचं ललित, वैचारिक आणि परिक्षणात्मक लेखन सातत्याने प्रसिद्ध होत असतं. तसंच टाटा समाजविज्ञान संस्थेच्या "स्त्रीमुक्तीच्या पाऊलखुणा" ह्या प्रकल्पान्तर्गत त्यांनी लिहिलेली पं. रमाबाई, रमाबाई रानडे,आणि ताराबाई व जनाक्का शिंदे ह्या एकोणिसाव्या शतकातील चार स्त्रीयांची चरित्रं लिहित असतांना साहजिकच एकोणिसाव्या शतकातल्या स्त्री-अस्मितेच्या वाटेवर इतर प्रवासिनींचाही त्यांनी सखोल अभ्यास केला. त्या अभ्यासाचा लाभ वाचक भगिनींना मिळावा, त्यापासून त्यांनी स्फूर्ती घ्यावी म्हणून ह्या वेगळ्या वाटेने जगलेल्या कर्तृत्ववान स्त्रियांची व त्यांच्या कार्याची ओळख त्या करुन देत आहेत. वाचकांना ती स्वतःचा व आपल्या वर्तमानाचा शोध घेण्यात खचितच दिशादर्शक ठरतील.