Name of Book : आकाश पत्रे

Name of Author : डॉ. शरदचंद्र गोखले

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 154

Synopsis :
विज्ञानाने माणसांचे प्रश्न जसे सोडविलेले आहेत तसे गुंतागुंतीचेही करुन ठेवलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे माणुसकीच्या आधारानेच शोधावी लागतात. म्हणून माणसांच्या आयुष्यातल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरीता विचारांचे क्षितिज आभाळाइतके मोठे करायचे पण वास्तवातले भान मात्र सुटू द्यावयाचे नाही असा हा अवघड तोल आहे. पाहिलेली एखादी वास्तू मग ते मार्क ट्‍वेनचे घर असो किंवा मलेशियातील गढी असो, विसरु म्हणता विसरता येत नाही. म्युनिक किंवा व्हिएन्नासारखे शहरही आपल्याला कायम खुणावत राहते, किंवा सामोवा किंवा श्रीलंकेसारख्या देशातील निसर्गसौंदर्याची मोहिनी मनावर कायमची राहते. नेपाळमधला बोरिस असो, जपानमधला आत्मसन्मानासाठी झुंझणारा अपंग उमिमोतो असो ही जबरदस्त माणसे आहेत. ही माणसे, ह्या वास्तु हे अनुभव मनाला भिडतात. हे सारे अनुभव पत्रातून लिहावेत, आपल्या स्नेह्या-सोबत्यांना कळवावेत असे वारंवार वाटे; परंतु पायाला चक्र असल्यामुळे लिखाण नेहमीच होणे शक्य होत नसे. मग कधी तरी मनात येई की, आपण आभाळाचाच कागद करुन जर पत्र लिहिले तर जगात कुठेही असणाऱ्या आपल्या आप्त-स्वकीयांना, मित्रांना हे वाचता येईल. कोणीतरी कुठेतरी वाचतील.