Name of Book : मंदिरातील खून

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 97

Synopsis :
तो साधु शरीराने धट्टाकट्टा होता. त्याची नजर कठोर आणि चेहऱ्यावर अफाट बुध्दीमत्तेची छाया. मंदिराच्या दारात उभा राहिला त्या साडेसहा फूट उंचीच्या साधूचे डोके दाराच्या वरच्या चौकटीला टेकल्यासारखे वाटायचे. त्याने वयाची पन्नाशी ओंलाडली असावी. त्याचे केस अर्धवट पिकलेले होते. दाढी अद्याप छातीपर्यंत पोचत नव्हती. भरदार मिशा दाढीत पार मिसळून गेल्या होत्या. सोनेरी कडांचा आणि गोल काचांचा चष्मा तो डोळ्यांना लावीत होता.