Name of Book : कंगोरे

Name of Author : प्रा. कुंदबाला खांडेकर

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 72

Synopsis :
’उशीर’ नावाचा बागुलबुवा-- जिद्दीने जीवनात वाटचाल करताना हा ’उशीर’ नावाचा बागुलबुवा स्त्रियांना मधून-मधून छळत राहतो आणि या वाटचालीची गती मंदावते. शहरातल्या गृहिणी, मुली किंवा रोज घराबाहेर पडणाऱ्या स्त्रियांनाच हा बागुलबुवा छळतो असं नाही, तर ग्रामीण भागात या बागुलबुवाचं राज्य फार प्रबळ आहे. घरातल्या पुरुषाला उशीर झाला तर त्याच्या समर्थनार्थ त्याने ऎकवलेले दोन शब्द ंसगळ्यांचं समाधान करु शकतात. पण स्त्रियांच्या मनात हा ’उशिरा’ चा बागुलबुवा, धाक आणि भीती नेहमीच असते.