Name of Book : शिंपला

Name of Author : संध्या रानडे

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 222

Synopsis :
मला आतून कुठेतरी जाणवत होतं, हातात ब्रश घेऊन आमच्या संसाराचं चित्र रंगवणं तर मला जमणारच नाहीय; पण पेन-पेन्सिल घेऊनही रेखाटणं माझ्याच्यानं होणार नाहीय. कारण आबांच्या सहवासात काढलेले दिवस, मुलींबरोबर घालवलेले दिवस, अंजनीच्या सान्निध्यात उपभोगलेले दिवस, माईचे शेवटचे दिवस अन् आता जात असलेले हे कंटाळवाणे दिवस! ह्यातला प्रत्येक दिवस हा स्वतंत्र दिवस होता. ताण, आनंद, सुख-दुःख अन् शेवटची ही एकलेपणाची आग. जे मी प्रत्यक्षात जगलो होतो, ते शब्दात उतरवणं का जमत नव्हतं मला? की मला ते उतरवायचं नव्हतं? वाटत होतं, विद्याला आपलं जगणं, आपला संसार, आपलं घरकुल, सगळंच आदर्शवत वाटतं; पण आदर्श असायचं ही कल्पना डोळ्यापुढे ठेऊन ना कधी आपण जगलो ना अंजनी. एकमेकांचे सूर जुळले आणि त्यांनी आपल्या आयुष्याचं संगीत मधुर करुन टाकलं.