Name of Book : शल्य त्या अधुऱ्या स्वप्नांचे

Name of Author : चंद्रकुमार नलगे

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 200

Synopsis :
आयुष्य तसं मोठं विलक्षण असतं. अनेक चकवे हूल देऊन जातात. वाटा वळणावळणानं जाऊन आडवळणं केव्हा घेतात ते कळत नाही. नजरेसमोरच्या दिसणाऱ्या दिशा केव्हा रानभैर करतील ते सांगता येत नाही. क्षितिजरेषेवर दिसणारा, उमलणारा प्रकाश केव्हा असा घन अंधार गिळून टाकील सांगता येत नाही. श्रावणातल्या रिमझिमणाऱ्या पावसाचंही कसं मृगजळ बनलं ते लक्षात येत नाही. डोईवरचं उभं आभाळ कुठल्या अज्ञात हातानं पुसून टाकलं ते उमगत नाही. बघता बघता दुधेरी चांदणं कसं करपतं याचा अनुभव येतो. गुलाबी थंडीचेच काळजाला चटके देणारे दाहक निखारे बनतात. आयुष्याच्या खतपाण्यानं मोहरलेला गंधमोहर डोळ्यादेखत करपून जातो.