Name of Book : धरणग्रस्त

Name of Author : जगदीश अभ्यंकर

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 115

Synopsis :
काळ पुढे धावत होता. नवी वर्षे येत होती. कालामानानुसार तुरळक बऱ्या-वाईट घटना घडत होत्या. पण त्या फार परिणामकारक नव्हत्या. मात्र एक लक्षणीय बदल हळुहळू जणवू लागला होता. दरवर्षी नियमानं येणारा आणि नक्षत्रांना अनुसरुन पडणाऱ्या पावसाळ्याचे वेळापत्रक बदलत चालले होते. रोहिणी नक्षत्रात हमखास बरसणारा पाऊस मृग नक्षत्र उलटून गेलं तरी बरसायचा नाही. पाऊस पडेल अशी चिन्हंही लवकर दिसायची नाहीत. वर्षागणिक उन्हाळ्याचा कडाकाही वाढतच चालला होता. पुष्कळदा हाता-तोंडाशी आलेलं पीक अती उन्हानं वाळून जात असे. गोदामायलाही उन्हाळा सहन व्हायचा नाही. नदीच्या पात्रात तुंबलेल्या पाण्याची जागोजाग डबकी दिसत. त्या डबक्यांचाच आधार गावकऱ्यांना उन्हाळ्यात रहात असे. हाश-हुश करत कसातरी उन्हाळा पार व्हायचा. हा बदल फक्त नैसर्गिकच होता की अजुन काही त्याला अर्थ होता? कोणी समजू शकत नव्हते.