Name of Book : लज्जाहोम

Name of Author : डॉ शरद कुलकर्णी

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 129

Synopsis :
आमचा परंपरागत भिक्षुकीचा व्यवसाय. बाबा दररोज पहाटे लवकर उठून, स्नान करुन, आबासाहेबांकडे, पूजा करायला जात. चातुर्मासात निरनिराळे धार्मिक कार्यक्रम चालायचे, नवरात्रात, सप्तशतीच्या पाठाला, बाबा दररोज जायचे, तेंव्हा त्यांच दुपारचं जेवण, आबासाहेबांकडेच असायचं. धार्मिक कार्यक्रमा निमित्त मलाही बऱ्याच वेळा, बाबांबरोबर, आबासाहेबांकडे जेवायला बोलवणं असायचं, तेव्हा रामनाथ शेजारी पाट असायचा.कुळधर्म, कुळाचाराला, मुख्य पुरोहित बाबाच असायचे. त्या प्रित्यर्थ, दर महिन्याला नियमित उत्पन्न तर मिळायचंच, पण त्याशिवाय, अडीअडचणीच्या वेळी, अगदी विश्वासानं बाबा आबासाहेबांकडे शब्द टाकायचे. तो शब्द कधीही अव्हेरला गेला नाही. माझं शिक्षण होईपर्यंत, बऱ्याच वेळा माझ्या शिक्षणासाठी, बाबांनी आबासाहेबांकडून पैसे आणले होते. मात्र परिस्थितीचा असमतोल आमच्या मैत्रीच्या आड कधीच आला नाही.