Name of Book : हास्य तरंग

Name of Author : सुभाष भेंडे

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 206

Synopsis :
सिंगापूरचे नगरविकास आणि कुक्कुटनिर्मूलन खात्याचे मंत्री, चिन चिन च्यू, बिहार राज्याला भेट देण्यासाठी आले तेव्हा मुख्यमंत्र्यांना पाहुण्यांना काय दाखवू, काय नको, असं झालं. स्वातंत्र्यानंतरच्या पन्नास वर्षांच्या काळात बिहारनं सर्व आघाड्यांवर प्रचंड प्रगती केली होती. पाच हजारांहून अधिक कुटुंबांचं दारिद्र्यनिर्मूलन झालं होतं आणि या कुटुंबातील जवळजवळ चाळीस हजार माणसं सुखोपभोगात गडबडा लोळत होती. गावागावात टेलिफोन बूथ्स आणि बीअरबार्स पोचले होते. गोरगरीबांचे केस कापण्याचा खर्च दस्तुरखुद्द मुख्यमंत्री आपल्या खिशातून करत होते. राज्यातल्या लक्षावधी गूरांना चारा मिळत नव्ह्ता. पण हवेत तरंगणारा ओझोन व ऑक्सिजन नाकावाटे जोरात घेऊन यच्चयावत् गुरं मुख्यमंत्र्यांप्रमाणं गलेलठ्ठ झाली होती. हे सर्व पाहून चिन चिन च्यू अत्यंत प्रभावित झाले. संपूर्ण राज्याचा दौरा सत्तर तासात आटोपून जेव्हा ते पाटण्याहून परत निघाले, तेव्हा केसांचा ’लल्लूकट’ केलेल्या श्ंभर तरुणांनी त्यांना सलामी दिली. ती पाहून तर पाहुण्यांना गहिवरून आलं. "आता आपण आणखी कुठं जाणार? राजस्थानकडे की महाराष्ट्राकडे?" मुख्यमंत्र्यांनी त्यांना विचारलं. रुमालानं डोळे पुशीत चिन चिन च्यू म्हणाले, "हे एवढं आदर्श राज्य पाहिल्यावर मला आणखी कुठं जायची गरज वाटत नाही."