Name of Book : खारुताईची गोष्ट

Name of Author : अशोक कुमठेकर

Reading Cost : $0.5/ Rs.5 / Free

No. Of Pages : 18

Synopsis :
"मुलांनो खारुताई कोणत्या रंगाची असते?" "काळ्या-पांढऱ्या रंगाची." कुणीतरी मागून उत्तर दिले. "तिच्या अंगावर जे पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात ना! ते कशामुळे झाले कोणाला माहिती आहे काय?" गुरुजींनी विचारले तशी वर्गात एकदम शांतता पसरली. कारण मुलांना त्याचे उत्तर माहीत नव्हते. "मी सांगतो, ऎका तर मग खारुताईची गोष्ट" असे म्हणून गुरुजी सांगू लागले. वर्गावर आल्यावर पहिल्यांदा त्यांनी वर्गातला फळा डस्टरने पुसून काढला होता आणि फळ्यावर, झाडावर चढणाऱ्या खारुताईचे चित्रपण काढले होते.