Name of Book : नरभक्षक

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 113

Synopsis :
सूर्य मावळण्याचा समय होता तो. सूर्याने क्षितिजाआड अर्धीअधिक बुडी मारलीच होती. झाडांचे शेंडे पिवळसर तांबूस झाले होते. हळुवार चोरट्‌या पावलांनी अंधार पुढे पुढे सरकत होता, पृथ्वी गिळून टाकण्यासाठी. आणि त्या वेळी एक तरूण घोडेस्वार शिवपुरीहून शहाबादकडे चालला होता. पांढरा अरबी घोडा राजहंसाप्रमाणे पावले टाकीत चालला होता. त्याला कसलीही घाई नव्हती. शहाबाद फारसे दूर राहिले नव्हते.