Name of Book : गोदाकाठचे गणगोत

Name of Author : जगदीश अभ्यंकर

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 81

Synopsis :
प्रत्येक माणसाच्या ठायी वेगवेगळे गुण असतात. जसे माणसाचे तसे गावाचेही असते. प्रत्येक गाव वैशिष्ठ्यपूर्ण असते. एक गाव दुसऱ्या गावासारखे नसते. मराठी माणसाचं नाटकवेड जरी प्रख्यात असले तरी प्रत्येक गावातून काही नाटकवेड दिसत नाही. त्यातूनही एखाद्या गावाने नाट्यपरंपरा जपणं म्हणजे महाअवघड काम! माझे गाव मात्र त्याला अपवाद आहे. नाट्यवेडं गाव म्हणून गंगापूर तालुक्यातील नेवरगाव प्रसिध्द आहे. नेवरगाव येथे दोन प्रमुख नाट्यमंडळं आहेत. ती म्हणजे श्रीराम प्रासादिक नाटक मंडळ आणि अनंत प्रासादिक नाटक मंडळ. जवळपास १२० वर्षांची नाट्य परंपरा या दोन्ही मंडळाची आहे.