Name of Book : ज्ञानेशाचा रेडा आणि रामाची खार

Name of Author : आशा भिडे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 38

Synopsis :
खारुताई तावातावानं बोलत होती नि ज्ञानादादा खालमानेनं ऎकत होता. "अरे तू वेद म्हटलेस यात तुझा काय मोठेपणा? मोठेपणा, सामर्थ्य आहे ते ज्ञानेश्वर महाराजांचं! त्यांच्या सामर्थ्यामुळे त्यांनी तुझ्या तोंडून वेद म्हणवून घेतले. ते सिध्द्पुरुष होते, अलौकिक होते, पण त्यामुळे तू कसा मोठा ठरशील? आता पुन्हा वेद म्हणण्याचे सामर्थ्य आहे का तुझ्यात? हे न जाणता बसले देव्हारे माजवून स्वतःचे," रागाने खारुताईची शेपटी टम्म फुगली. ज्ञानादादा आता मात्र घाबरला मनातून.