Name of Book : सातच्या आत घरा बाहेर

Name of Author : डॉ. सुवर्णा दिवेकर

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 162

Synopsis :
’साहित्य संगम’ संस्थेचा अर्धाच भरलेला हॉल ’मुक्ता मयूरेच्या’ आवाजात दुमदुमला होता. "भारतीय संस्कृतीने स्त्रीची कायम गळचेपी केली आहे. मनूने तर स्त्रियांवर अत्याचाराची शिफारसच केली होती. तो नेहमी कायसंसं म्हणायचा. माहीत आहे? काय बरं? मुक्ता मयूरे भाषण करता करता मध्येच थांबल्या. ख्ररं तर हा हमखास टाळ्या मिळवणारा पॉज असायचा. नंतर आठवल्यासारखं करून पुढचं वाक्य म्हणायच्या. "तुम्हाला माहीत नसेल, कारण भारतीय स्त्री मुळी चूल आणि मूल या कंसाबाहेर कधी पडलीच नाही. तेव्हा मनूची वचने वाचायला वेळ कुठला भेटायला? तर स्त्रियांनो. तो नेहमी म्हणायचा... तो म्हणजे मी मघाशी म्हटलेला मनू बरं का. ’न स्त्री स्वातंत्र्य मर्हती’ म्हणजे काय, स्त्रियांना... "स्वातंत्र्य नको." हा आवाज कोरसमध्ये आला.