Name of Book : प्रवासिनी

Name of Author : मृणालिनी जोगळेकर

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 203

Synopsis :
फार सुंदर लिहिते मृणालिनी. प्रवासाचं तिला अतोनात वेड आणि अनेकानेक विषयांबद्दलचं कुतूहल हे तिचं स्वभावगत वैशिष्ट्य. तिला येणाऱ्या अनुभवांचा शोध ती वेगवेगळ्या पातळ्यांवरुन घेत राहते आणि महत्वाचं म्हणजे स्वतःला जाणवलेलं सर्व, जसंच्या तसं, तिला वाचकांच्या मनापर्यंत पोचवता येतं. मग तिला प्रवासात भेटलेल्या व्यक्तींची आपल्याशी भेट होते; ती पाहत असलेली स्थळं आपणही पाहत जातो आणि तिने अनुभवलेलं सगळं काही आपलंच होऊन जातं. जणू वेगवेगळ्या दुर्मिळ फुलांचा एक गुच्छ या "प्रवासिनी" ने आपल्या हाती दिला आहे, त्यांचे मोहक रंग न्याहाळतांना ते गंधकोष सहजपणे आपल्याला सामावून घेतात.