Name of Book : सार्थक

Name of Author : वैजयंती काळे

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 193

Synopsis :
निवान्त जगण्याची मला हाव नाही. गरिबीलाही मी घाबरत नाही. मी त्याला वेळोवेळी म्हणत होते, आपण हे आव्हान घेऊ, अपयशाचं रुपांतर यशात करुन दाखवू. पण त्यानं नाहीच ऎकल! गीताचा आवेग अनावर झाला. "आणि माझं मात्र आयुष्य कुजत पडलं!" " आपल्या निखाऱ्यावरची राख आपणच फुंकायची असते गीता!" विनायक म्हणाला. "आणि त्याला कधीच उशीर झालेला नसतो." "हो. आज मीही तेच ठरवून आले आहे!" गीता निश्चयी स्वरात म्हणाली. " मी तुझ्या मदतीला येते" विनायक आर्श्च्याने तिच्याकडे बघत राहिला. " आणि प्रकाश?" "त्याला माझी गरज नाही. कुणाचीच नाही. तो फक्त स्वत:साठी जगणारा माणूस आहे. मला यापुढे दुसऱ्यांसाठी जगायचंय- तुझ्यासारखं!"