Name of Book : शोध

Name of Author : डॉ विजय पांढरीपांडे

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 223

Synopsis :
घशाला जीवघेणी कोरड पडली तेव्हा नाईलाजानं मालती अंथरुणावरुन उठली. अगदी हलकेच. मांजरीच्या पावलानं. अनिकेत तिच्या शेजारीच गाढ झोपला होता. बाळसं धरलेल्या गोजिरवाण्या मुलासारखा. शांत, तृप्त. त्या अंधारातही त्याच्या मिटल्या पापण्यांवर गाढ समाधानाचा भाव मालतीला दिसला.