Name of Book : माझ्या सार्वजनिक जीवनाची बखर

Name of Author : डॉ. शरदचंद्र गोखले

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 383

Synopsis :
स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पिढीला समाज विकासाच्या अनेक क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे डॉ.शरच्चंद्र गोखले यांनी बालकल्याण, अपंगांचे पुनर्वसन, कुष्ठनिर्मूलन, वयोवर्धन अशा अनेक क्षेत्रांत काम करुन आपला ठसा उमटवला आहे. महाराष्ट्र शासन, भारतसरकार आणि युनायटेड नेशन्स या सर्वच क्षेत्रात त्यांना मान्यता मिळाली. आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्काराने ते सन्मानित झाले. इंग्रजी व मराठी भाषेतील ३० पुस्तकांचे लेखक,संपादक, आंतरराष्ट्रीय समाजविकास-तज्ञ, कुशल प्रशासक, संशोधक व प्राध्यापक व एक जेष्ठ पत्रकार असा त्यांचा लौकिक आहे. देशविदेशात काम करताना डॉ.शरच्चंद्र गोखले ह्यांना जी माणसे भेटली, जो समृद्ध अनुभव आला त्याचे शब्दांकन करुन, चिंतनातून साकारलेल्या जीवनाची वैचारिक भूमिकेचे विवेचन "माझ्या सर्वजनिक जीवनाची बखर" या पुस्तकात त्यांनी केले आहे. स्वतःवर झालेल्या घरच्या संस्कारांचे हृद्य चित्रण आणि अनाथ मुले, अपंग, कुष्ठरोगी आणि जेष्ठ नागरिक या प्रश्नांचा वेध घेताना आलेला कार्यानुभव यामधून त्यांच्या सामाजिक जाणीवांचे जिवंत प्रतिबिंब दिसते.