Name of Book : सरांचा सौदा

Name of Author : वैजयंती काळे

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 213

Synopsis :
दर वर्षीप्रमाणे यंदाही जोशी सरांकडे गुरुपौर्णिमेची वर्दळ होणार होती आणि त्याच वार्षिक क्रमाने आदल्या रात्री ते पत्नीला विचारीत होते, " उद्यासाठी काहीतरी आणून ठेवायला हवं, नाही का ग? पोरं एवढी येतात, त्यांच्या हातावर काहीतरी दिलं पाहिजे." काकू गंमतीने हसल्या, " अहो, तुम्ही शाळेतून निवृत्त झालेले आहात. आता काही पाचवी-सातवीची मुलं येणार नाहीत तुमच्याकडे! चांगले मोठे मोठे प्राध्यापक, ऑफिसर येतील. गेली चार वर्षे आपण बघतोय ना!" "अग, ते खूप मोठे झाले असले तरी आपल्या दृष्टीने शाळकरीच! गुरुजींनी काहीतरी दिलं यातच त्यांना आनंद असतो." तीस-पस्तीस वर्षे सतत मुलांच्या पिढ्यांमागून पिढ्या सरांच्या हाताखालून जात होत्या. पहिल्या वर्षी मुलांची सरांशी ओळख झाली की त्यांचे कायमचे ॠणानुबंध जुळायचे. असे कितीतरी विद्यार्थी होते की जे आपापल्या क्षेत्रात नावारुपाला आल्यावरही कृतज्ञतेने म्हणायचे, "माझ्या या यशाचा पाया जोशी सरांनी घातला!" सरांना या गुण गौरवापेक्षा आनंद व्हायचा तो आपल्या विद्यार्थ्यांच्या यशाचा.