Name of Book : आत्महत्या

Name of Author : चंद्रकुमार नलगे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 144

Synopsis :
त्याचं नाव तसं चिंतू. लहान होता तेव्हा पोरंबाळं चिंत्या म्हणत. पुढं गल्लीतील माणसं चिंतोबा म्हणू लागली, चिंतोबाचं लग्न झाल्यावर लहान पोरं चिंतूअण्णा म्हणू लागली.चिंतूअण्णा इथवर नामकरण पोचलं. तेच नाव चिंतुन्ना असं वाखाणलं जाऊ लागलं. चिंतुन्ना तसा साधाभाडा माणूस. पूर्वीचं भलं घराणं. पण पिढ्या बदलू लागल्या. चिंतुन्नाच्या पिढीपर्यंत एक-दिन एकरापर्यंत जमिनीची तुकडी उरली. कसं तरी पोटपाणी चाले. दोघं भाऊ भाऊ. एक चिंतुन्ना आणि दुसरा विठोबा. चिंतुन्ना शेतीभाती करी. एकट्याला राबायला जमीन पुरी पडना म्हणून विठोबा धरणाच्या कामावर जाऊ लागला.