Name of Book : दानयोगी विनोबा

Name of Author : श्री. सविता भावे

Reading Cost : $1.0/ Rs.25 / Free

No. Of Pages : 342

Synopsis :
विनोबाजी गांधीजींच्या आश्रमात गेल्यानंतर काही दिवसांनीच गांधीजी उद्गारले होते की,"सारे लोक येथून काहीतरी नेण्यासाठी येतात. हा एकच तरुण येथे काही देण्यासाठी आला आहे!" त्यांचे हे उद्गार विनोबांच्या एकूण जीवनाचेच द्योतक ठरले. जन्मभर ते देतच गेले. भूदान म्हणजे देखील त्यांच्या शब्दात भिक्षा नसून "दीक्षा" होती. आचार्य विनोबा भावे या लोकोत्तर पुरुषाच्या आयुष्याची वा विचारांची कोणतीच बाजू सामान्यांच्या मापाने तोलता येणारी नाही. पण तरी सुद्धा त्यांच्या शिकवणीचा काही ना काही अंश प्रत्येक माणसाला आचरणात आणण्याजोगा आहे हे विशेष. अशा या महान विभूतीबद्दल देश-परदेशी, विविध भाषांतून, वेळोवेळी उदंड लिखाण झाले आहे. तथापि त्यांच्या जीवनकार्याचे समग्र आणि नेटके दर्शन घडविणारा ग्रंथ निर्माण झालेला आढळत नाही. ती गरज या पुस्तकाने विनोबाजींच्या जन्मशताब्दीच्या मुहूर्तावर पुरी होत आहे.