Name of Book : निरोप

Name of Author : संध्या रानडे

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 208

Synopsis :
सुभाषचं बोलणं आठवता आठवता रेणूनं अस्वस्थपणे कूस बदलली. तिला ठाऊक होतं. तो बोलला होता त्यातलं अक्षर अन् अक्षर खरं होतं. जे घडत होतं, त्याचा तिला स्वतःला कमी का मनःस्ताप होत होता? पण वर्षानुवर्षांच्या अपमानांनी, उपेक्षांनी, प्रतारणांनी मनावर उठवलेले वळ ममतेच्या स्पर्शासाठी आसुसलेले होते. सुभाषच्या रुपानं ध्यानीमनी नसताना मायेच्या सहस्त्रधारा बरसल्या आणि आयुष्याला वेगळी दिशा मिळेल, ह्या आशेमागे वेडं मन धावत सुटलं. वाटेतले खचखळगे दुर करत मंझील गाठायची ताकद आहे आपल्यात? अन् तशी ती नसली, तर ज्या वळणावर सुभाष आपली वाट बघतोय, तिथेच त्याला ताटकळत ठेवण्याचा अधिकार आहे आपल्याला? अशा वळणावर जिथून तो आपल्याशिवाय पुढे सरकूच शकणार नाही असं त्याला वाटतंय?