Name of Book : फणसाखालचं घर

Name of Author : चंद्रकुमार नलगे

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 225

Synopsis :
त्यानं एक दिर्घ सुस्कारा टाकला. खोपीच्या मधल्या मेढीजवळ सरकला. अवघडलेली पाठ मेढीला टेकवली. गुढग्याभोवती हात बांधले अन् गुढग्यावर हनुवटी टेकून डोंगर गिळत येणाऱ्या अंधारावर नजर स्थिर केली, नजरेपुढं काहीच नव्हतं. नजरेत होता-फक्त उलट्या बाहुलीसारखा टांगलेला काळा काळ! फणसाखालचं घर आता उभ्या उभ्या ढासळलं होतं. बाबून्या गेला तो आलाच नाही दिवा लावायलाही कोणी मागे उरलं नाही...