Name of Book : गंधवीणा

Name of Author : मंदा कदम

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 88

Synopsis :
सध्या ललित लेख हा दुर्मिळ होत चालला आहे. अशावेळी मंदा कदमांचे हे लेखन वाऱ्याची सुखद झुळुक यावी तसे आहे. ह्या संग्रहात विविध रुपाने नांदणारा निसर्ग आहे. प्रवासातील गमतीजमती, विविध तऱ्हेची माणसे, त्यांच्या जगण्या वागण्याच्या पद्धती, स्वतःचे कुटुंब, कुटुंबाचे संस्कार ह्या साऱ्यांना चित्रमय शैलीत अत्यंत आत्मियतेने रेखांकित केलेले आहे. गंधवीणामधील ललित लेखांमध्ये उत्कट आत्माविष्कार प्रगट झाला आहे. ह्या लेखामधील काव्यात्मकता, रसिकता, सौंदर्य दृष्टी आणि सुभग भाषाशैली मनाला स्पर्शून जाते. निसर्गावर, मानवी भावसंबंधावर तसेच अनेक कलाप्रकारावर प्रेम करणारे कलासक्त मन सतत जाणवत राहते. या लेखनामागे लेखिकेची अनुभूती आहे. चिंतन आहे. आणि ते ठिकठिकाणी सहजपणे अभिव्यक्त झाले आहे.