Name of Book : भल्लवाचा पराभव

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 88

Synopsis :
शिलाँगच्या बझार भागात एक हिरव्या रंगाची फियाट शिरली तेव्हा अनेकांनी तिच्याकडे कुतुहलाने पाहिले. ती गाडी अठरा ते वीस वयाची एक तरुणी चालवीत होती. गाडीकडे ज्या नजरा खिळल्या होत्या त्या केवळ तिला पहाण्यासाठीच. त्या तरुणीला ते प्रथमच पहात होते. इतकी सुन्दर तरूणी आपल्या भागात आली असताना तिच्याकडे पाहिले नाही, तर तो स्वतःचाही अपराध ठरेल असेच प्रत्येकाला वाटत असावे.