Name of Book : प्रश्न कायद्याचा आहे... जरा जपून!

Name of Author : ऍड. सौ. सुषमा सावळे

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 200

Synopsis :
कायदा म्हणजे सर्वांनी पाळावयाचा नियम. सहाजिकच, तो सर्वांना माहीत हवा. शिवाय, तो सर्वांना कळायलाही हवा. तो अवघड असेल, त्याचा अर्थ लावणे कठीण असेल तर तो पाळणार कसा? आपल्या देशात परकीय राजवटीमुळे कायदे त्यांच्या भाषेत म्हणजे इंग्रजीत होऊ लागले. ते अजूनही त्याच भाषेत मुख्यतः होतात. शिवाय, कायद्याची इंग्रजी भाषा, सामान्य माणसाच्या व्यवहारातील इंग्रजी भाषेपेक्षा फारच वेगळी असते. कोर्टातले गंभीर वातावरण, न्यायाधीश व वकील यांचे परिवेश या सगळ्यामुळे माणसाच्या मनात कायद्याविषयी आणि एकूणच न्यायव्यवस्थेविषयी थोडीशी भिती निर्माण झालेली असते. या भीतीत भर घालण्याचे काम कायद्याची भाषासुद्धा आपल्यापरीने करीत असते.