Name of Book : राजदंड

Name of Author : अनंत मनोहर

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 273

Synopsis :
शामियाना गच्च भरलेला होता. खेळाडूंच्या राखीव जागेकडे लोकांच्या नजरा खिळलेल्या होत्या. स्वतः महाराजांचा खास शामियाना आणि महाराणींचा शामियाना यांच्यामधे खेळाडूंच्या खास राहुट्या होत्या. सुवर्ण संस्थानात असे योग फार कमी येत असल्यानं आजच्या सामन्याला लोकांनी विशेष गर्दी केली होती. आजच्या सामन्याला आणखी एका कारणानं विशेष महत्व आलं होतं. आजचा सामनाच विशेष होता. युवराज महाराज आणि समरसेन महाराज यांचा खेळ प्रजाजनांना आज पाहायला मिळत होता. युवराज महाराजांना नाताळाची सुट्टी होती. बडोद्याहून समरसेन महाराज सुटीमधे सुवर्णपूरला आले होते. विक्रांत महाराजांना क्रिकेटचा षौक. ऎन उमेदीत विक्रांत महाराज हे उत्तम खेळाडू होते. ऑक्सफर्ड संघाचे ते मधल्या फळीचे विश्वासू फलंदाज आणि मंदगती गोलंदाज होते. मिडविकेट ही त्यांची क्षेत्ररक्षणाची खास जागा.