Name of Book : आजीची कविता

Name of Author : हरिष हातवटे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 81

Synopsis :
विज्ञान तंत्रज्ञान आज कितीही प्रगत झालं असलं तरी माणसांच्या मनातील दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या ओलाव्याचं उत्तर त्याच्याकडे नाही. ग्रामीण असो वा शहरी भागातील आजही ज्या ज्वलंत समस्या आहेत त्यांमध्ये कुटुंबातील वृध्दांचं असणारं स्थान हाही एक महत्त्वाचा घटक आहे, असं मला वाटतं. याला काही अपवादही असतील; परंतु बहुतकरुन वृध्दांची हेळसांड होताना दिसते. आयुष्यभर घराचं सुख देवाकडं मागणारी माणसं म्हातारपणी; लवकर मरण येऊ दे’ असं म्हणतात हे ऎकताना काळीज बधीर होऊन जातं.