Name of Book : युगकर्ता

Name of Author : श्री. सविता भावे

Reading Cost : $1.0/ Rs.25 / Free

No. Of Pages : 336

Synopsis :
लोकमान्य टिळकांच्या जीवनावर गेल्या कित्येक वर्षात अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत आणि नवे नवे ग्रंथही प्रकाशित होत राहतील. "युगकर्ता" हे लोकमान्यांच्या जीवनावर लिहिलेले पुस्तक त्यांपैकी एक आहे. जसा जसा काळ पुढे चालला आहे तसा तसा लोकमांन्याच्या जीवनाच्या अनेक विविधपैलूंवर नवा प्रकाश पडत आहे. त्यामुळे नवीन पुस्तके येऊन इतिहासाची मूळ साधने उपलब्ध होत आहेत. या विषयावर व्यासंग करणारी तरुण मंडळी पुढे येत आहेत. त्यामुळे लोकमान्य टिळकांवरचे वाड्मय नित्य वाढत राहणार आहे. हिंदुस्थानच्या इतिहासाच्या एका बिकट काळात लोकमान्य टिळकांनी राजकीय क्षेत्रात वैचारिक नेतृत्व दिले त्यामुळे त्यांच्या कार्याला एक प्रकारचे अमर स्वरुप प्राप्त झाले आहे. लोकमान्य टिळकांच्या जीवनातील अनेक नव्या गोष्टी या पुस्तकात पाहण्यास सापडतात. श्री. भावे यांनी नव्या पिढीस उपयुक्त अशा तऱ्हेचे हे पुस्तक लिहून लोकमान्य टिळकांची प्रतिमा समाजापुढे सार्थपणे उभी करण्याचा प्रयत्न केला आहे.