Name of Book : निळ्या डोळ्यांचा माणूस

Name of Author : डॉ. छाया महाजन

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 145

Synopsis :
सध्या अनेक भाषांमधील साहित्य मराठीत येते आहे. त्यात प्रामुख्याने कादंबऱ्यांचा समावेश जास्त आहे. फार पूर्वी "द पीस ऑफ स्ट्रींग" ही मोपासाची कथा मला फार आवडली होती. मोपासासारखा शतक उलटून गेलेला, अत्यंत प्रभावी आणि जागतिक कथा साहित्यात प्रथम क्रमांकाचा संदर्भ प्राप्त झालेला लेखक त्याच्या कथांव्दारे मराठी वाचकांपर्यंत पोचवावा ही प्रामाणिक इच्छा होती. त्याच्या कथांमध्ये वास्तवाचे चित्रण आहे. पण ते फोटोग्राफीक नाही ते सर्व बाजूंनी परिपूर्ण आहे. त्यात सौंदर्य आहे. निवड आहे. तीव्रता आहे. वास्तववाद्यांसारखे पूर्ण सत्याकडे साहित्य खेचून नेण्याचा अट्टाहास आहे. आज शंभर वर्षानंतरही त्या कथांमध्ये ताजेपणा आहे. कथांमध्ये वैविध्य आणि टीकात्मक दृष्टीकोनही जाणवतो. काळाच्या ओघात समर्थ साहित्यिक म्हणून त्याचा गौरव योग्यच वाटतो.