Name of Book : हिमालय-दर्शन

Name of Author : शं.स. दाते

Reading Cost : $1.0/ Rs.25 / Free

No. Of Pages : 448

Synopsis :
श्री बद्रीनारायणाची यात्रा आणि श्री कैलास- मानसाची यात्रा यांत फार मोठा फरक आहे. बद्री नारायणाचे यात्रेंत खाण्याचे जिन्नस, हवेचा विरळपणा, वाटेचा अवघडपणा, या हिंदुस्थानांतच वस्ती आणि घरच्या माणसांचें पत्र-व्यवहार या सोयी आहेत. यामुळेच बद्री नारायणाला पुष्कळच म्हणजे दर वर्षी दहा-वीस हजार यात्रा जातें. तशी कैलासमानस या यात्रेस दर वर्षातून पाच-दहा माणसे तरी जात असतील की नाही ह्याचीच शंका. तिकडचा प्रदेश निर्मनुष्य. तिबेटांतला प्रवास पंधरा हजार फुटावर करावा लागतो. खाण्याचे जिन्नस आपल्याबरोबर घेतले असतील तेवढ्यावरच भागवावे लागते. हवेचा विरळपणा असल्यामुळे श्वासोश्वासास अडचण फार व थकवाही फार येतो. श्री बद्रीनारायणापेक्षा वाट अवघड व जास्त धोकादायक आहे. या शिवाय येथें डाकूंचे भय फार असते. पुस्तकांतील स्थळांचे वर्णन वाचले म्हणजे त्या ठिकाणींच आपण आहोत असे वाटते. पहिले दीडशे मैल पायी चालण्याची वाट. त्यांतल्या त्यात धारचुला ते गर्ब्यांगपर्यंत सारखा चढ आणि त्यात जिप्ती आणि माल्पा यांतील वाटेचा बेभरंवशीपणा. आपण चढून वर आलो म्हणजे असे वाटते की, आपण येथून कसे वर चढून आलो? कैलासला जातांना जो चढ तो परत येताना उतार; जेव्हा आपण परत मार्गी येऊ तेव्हा या उतारावरून उतरावयाचे आहे.