Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : सूर्यफूल

Name of Author : अनंत मनोहर

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 274

Synopsis :
जीवनाला कित्येक वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवला. धनराज हायस्कूलमध्ये होणारी गर्दी संपली. प्रांगण मोकळे झाले. गेटवर गेला पूर्ण सप्ताह असलेले पोलीस एस.एस.सी. परीक्षा संपल्याबरोबर आपापल्या चौकीत हजर झाले. हा आठवडा त्यांना फार कठीण गेला होता. समुद्राबाहेर काढलेल्या मासळीसारखी त्यांची मनोमन तडफड चालली होती. आपण येऊ नये अशा ठिकाणी आलो आहोत हे त्यांना सारखं जाणवत होतं. वह्या, पुस्तक, नोट्स, गाईड्स, सुपरवायझर..... त्यांना हे सगळं अपरिचित वातावरण होतं. पण परिक्षा संपली. आपापल्या मूळ जागी ते हजर झाले. पोलीस कस्टडीत चौकशीसाठी डांबून ठेवलेले सज्जन, बाहेर घोटाळणारे त्यांचे नातेवाईक, आतल्या खोलीत मिशिला पीळ देत आरामात बसलेला लालवट डोळ्यांचा पी. एस.आय. अधून मधून कोऱ्या रंगीत कागदांची होणारी देवाण-घेवाण आणि त्यांच्या खसपशीचा येणारा विशिष्ट आवाज, ए भडव्या, किमाम तीससोबीस पान लाव, मित्रांच्या नादात फसलंय ते पोर. ते चोर नाहीय. मारु नका त्याला. त्याच्या आईने अन्न सोडलय. एक डाव माफी करा. हे ठेवा. दोन हजार आहेत.