Name of Book : सर्वोत्कृष्ट मराठी कथा खंड तीन

Name of Author : सौ छाया कोलारकर

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 231

Synopsis :
आपल्या भल्या मोठ्या पंजात किरकोळ टाक धरुन एकाग्रतेने श्री. चितळे ऑफिसचे काम करीत होते. अकाउंटंट जनरलच्या ऑफिसमधले आकडेमोडीचे काम ! पण कल्पनेने निर्माण केलेल्या राक्षसांशी ज्या उत्साहाने एखादा मुलगा आपल्या फूटपट्टीने लढाई करतो त्याच उत्साहाने श्री. चितळे संख्यांना छेदीत होते. त्या उत्साहाच्या भरात त्यांच्या शर्टच्या कफला शाई लागली होती, कोटाची पाठ घामाने ओली झाली होती, आणि त्यांचा चेहरा तेलकटपणाने लकाकू लागला होता. मराठी माणसाला विनोदाचं किती विलक्षण वेड आहे, हे आपण सारे जाणतो. ’टवाळा आवडे विनोद’ असं समर्थांनी म्हटलं असलं तरीही मराठी माणूस विनोदावरचं आपलं प्रेम लपवण्याचा कधी प्रयत्न करीत नाही. उलट जीवनातल्या प्रत्येक क्षणी, प्रत्येक स्थळी तो विनोद शोधीत असतो आणि आपला जीव रमवत असतो.