Name of Book : परिस पक्षी

Name of Author : जयश्री पाठक

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 121

Synopsis :
स्वातंत्र्योत्तर कालखंडाने भारतीय स्त्रीजीवनाला एक मोकळा श्वास दिला. ज्यामुळे स्त्रियांच्या जाणिवांच्या कक्षा लक्षणीयरित्या रुंदावल्या. तिची वावरण्याची क्षेत्रंच बदलल्यामुळे तिचे अनुभवही बदलले आणि त्यामुळे स्त्री साहित्याचा आविष्कार नवीन क्षितिजे काबीज करु लागला. नवीन विषय, नव्या मांडणीसह लेखिकांच्या कथांमधून प्रतिबिंबित झालेले दिसून येतात. जयश्री पाठकांच्या कथांचे निरिक्षण केल्यास असे दिसते की स्त्री-पुरुष नात्यातला संघर्ष, गुंतागुंत, मानसिक आंदोलनं, कुटूंब व्यवस्थेचे बदलते स्वरुप त्यांच्या कथांमधून दिसून येते.या कथांमधून एका चिंतनशील कवयित्रीची भावगर्भता सतत जाणवत राहते हे महत्वाचे.