Name of Book : एक वाडा उरलेला

Name of Author : अरुण डावखरे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 138

Synopsis :
एक थर्ड क्लासचा कंपार्टमेंट- गर्दीने गच्च भरलेला! मी एका बाकावर कसाबसा टेकून बसलो. झोपेने घेरलो होतो. रात्रीचा एक वाजला होता. मी जागा झालो. कोणत्या तरी एका स्टेशनवर गाडी थांबली होती. ’चाय गरम, दूध गरम-’ वगैरे आवाज. झोप चाळवली गेली; पण पुन्हा डुलकी लागली. ती पण फार थोडा वेळ! सिगरेटच्या चिरपरिचित वासाने मला जाग आली. मी डोळे उघडले- समोरच्या बाकड्यावर एक ऍग्लो-इंडियन पुरंध्री विल्स सिगारेटचा आस्वाद घेत होती.