Name of Book : धरित्री

Name of Author : सरोज सोनावणे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 130

Synopsis :
गिर्रेबाज पाखराने ऎटबाजपणॆ गिरकी घेत कमानीवर उतरावे आणि डौलदार मान वळवून इकडे तिकडे पहावे असा पाऊस ऎटीत आला. आणि प्रत्येक घराच्या खिडकीतून डोकावत छतावर स्थिरावला. मातीच्या गंधाने परिसर दरवळून गेला. पडून रहावेना तशी नंदीनी उठली, आणि तिने बाहेर डोकावले. आभाळात उन सावल्यांचा खेळ चालू होता.