Name of Book : कल्पतरु

Name of Author : सौ सुमन भडभडे

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 255

Synopsis :
’कल्पतरू शुश्रूषागृह’ अंबाझरी परिसरातील एक वास्तू. तशी साधीच, पण तिच्या वेगळेपणाने बघणाऱ्यांच्या डोळ्यांत भरत असे. अंबाझरी तलाव हा नागपूरपासून आठ-दहा किलोमीटर. पंचवीस वर्षापूर्वी तर हा भाग अगदी निर्जन होता. नेहमी प्रवाहित असलेला मानवनिर्मित तलाव तसा अगदीच दुर्लक्षित. कुणी नापास झालेला निराश विध्यार्थी, प्रेमभंगाने वेडा झालेला प्रेमवीर वा भ्रमिष्ट झालेला रुग्ण या तलावाचा आश्रय घेत. बाकी मानवप्राणी कुणी फारसा फिरकत नसे. परिसरात अक्षरशः श्वापदांचे जंगली राज्य होते. वाघ, सिंह अशा हिंस्त्र प्राण्यांपासून सशासारख्या भित्र्या प्राण्यांपर्यंत सारे ’जीवस्य जीवो जीवनम्‌’ या न्यायाने राहत होते. तलावाच्या पाण्यावर तहान भागवत. झाडांतून येणाऱ्या सोनेरी सूर्यकिरणांत विश्रांती घेत होते.