Name of Book : शिलेदाराची कैद

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 318

Synopsis :
नवरामुलगा लग्नाला चालला की आपण पाहतो तो बँड.... पण ही वरात अभिनव होती. शिवाजीनगर भागातून कुठूनतरी ती आली होती. सर्वात पुढे कोणता तरी खेळाचा संघ होता. गंजीफ्रॉक व चड्डी हा त्यांचा युनिफॉर्म होता. हळू धावावे तसे ते नाचत होते, ताशा ड्रमच्या तालात. त्याच्यामागे आणखी एक तसेच भयानक वाद्य. लेझीमचे हात करीत दहावीस माणसे नाचत होती. रस्ता भरला होता, वरातीतील माणसांनी.कोर्ट अगदी गच्च भरले होते. अत्यंत महत्त्वाचा खटला चालू होता. अत्यंत महत्त्वाची साक्ष देणारा साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभा होता. आत्माराम साखरे हा तरूण घामाघूम झाला होता. अगदी प्रथमच त्याची कोर्टात उभे राहण्याची वेळ होती. अत्यंत महत्त्वाची साक्ष तो देणार होता. माफीचा साक्षीदार बनला होता तो. साक्ष सुरु झाली. बचाव पक्षाचे वकील शांतपणे बसून ऎकत होते.