Name of Book : चिरंजीव

Name of Author : वैजयंती काळे

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 223

Synopsis :
पपांच्या मोटारीचा हॉर्न दुरुन ऎकू येताच अनिल आपल्या खोलीतून धावतच बाहेरच्या अंगणात आला. त्याची धावपळ बघून मामी हसत म्हणाल्या, ’ अरे तुझ्या वडिलांना यायला अजून खूप अवकाश आहे. किती वेळा आतबाहेर धावशील!’ खरे म्हणजे यशवंतराव आपल्या मुलाचे कसे कौतुक करतात हे बघायला त्याही अंगणात आल्या होत्या. ’आत्ता मी हॉर्न ऎकला आणखी दोन मिनिटात पपा येतील.’ अनिल ठामपणे म्हणाला. मी नाही ऎकला तो?’ मामींनी त्याला खोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पाठोपाठ अंगणात आलेली त्याची आई वात्सल्याने अनिलच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, ’आमचा अनिल चुकायचा नाही. वर्षाचा होता तेव्हापासून तो त्यांच्या गाडीचा हॉर्न बरोबर ओळखतो.’