Name of Book : मी हरलो नव्हे जिंकलो

Name of Author : उषा लिमये

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 62

Synopsis :
दैवाचा फासा उलटा पडला. श्रीमंत विश्वासराव पेशवे गोळी लागून पडले. भाऊसाहेबांचं मन बेहोष झालं. पुतण्याच्या मृत्यूचा धक्का त्यांना असह्य झाला. विजय मिळाला तरी हे काळं तोंड नानासाहेबांना कसं दाखवू असे उद्गार काढून डोळ्यांचं पातं लवतं न लवतं तो ते रणधुमाळीत अदृश्य झाले. शेकडो सैनिकांना कापीत पुढे जाणारं मराठ्यांचं धैर्य खचलं. हातातोंडाशी आलेला विजयाचा घास दैवानं काढून घेतला. सरदारांच्या संकेतानं चालणारं नी पुढाऱ्याच्या पराक्रमावर लढणारं मराठी सैन्य वाट फुटेल तिकडे पळू लागलं. आता मोगलांना वीरश्री चढली. आतापावेतो पलायनाच्या पावित्र्यात असलेले मोंगल त्यांची लांडगेतोड करु लागले. तहान, भूक, झोप सर्व विसरुन जीव घेऊन पळून जाण्यावाचून त्यांना मार्गच नव्हता.